भंडारा: 'तुम्ही नाव गायब करू शकता, तर मी तुमचा आवाज गायब करेन!'; उमेदवार ज्योती मलोडे यांची प्रशासनाला चेतावणी, व्हिडिओ <nis:link nis:type=tag nis:id=Viral nis:value=Viral nis:enabled=true nis:link/>
भंडारा नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ३ 'ब' मध्ये ईव्हीएम मशीनमधून चक्क उमेदवाराचे नाव आणि 'नोटा'चा पर्यायच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर घोळामुळे संतप्त झालेल्या उमेदवार ज्योती मलोडे यांनी मतमोजणी केंद्रावरच प्रशासनाला उघडे पाडले होते. "मला समजावण्याचा प्रयत्न करू नका, यंत्रणेत फेरफार करून माझं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला तर तुमचा आवाज गायब करेन," अशा आक्रमक शब्दांत निवडणूक विभागाला ठणकावून सांगितले. हा व्हिडिओ २५ डिसेंबर रोजी ६ वा. वायरल झाल