वाशिम: वाचनाने व्यक्तित्व घडते, आयुष्य समृद्ध होते — अॅड. विजयराव जाधव वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
Washim, Washim | Oct 15, 2025 वाचन माणसाला प्रगल्भ, बहुश्रुत आणि ज्ञानी बनवते. अफाट वाचन व अभ्यासामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजक्रांती घडविली. वाचन ही क्रांतिकारी बाब आहे; ती आपले व्यक्तिमत्त्व घडवते आणि आयुष्य समृद्ध करते,” असे प्रतिपादन व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांनी केले.