वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) चे अध्यक्ष तथा प्रबंध निर्देशक श्री. जे. पी. द्विवेदी यांची सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील मुख्यालयात आज दि 24 ऑक्टोबर ला 5 वाजता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतली. यावेळी वेकोलीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, भरपाई, रोजगार आणि स्थानिक विकासाशी निगडित विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.