बहिणीने घटस्फोट घेण्याकरीता दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी दमदाटी करीत पुजा विजय पाटील (वय २९, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणीची दुचाकी संशयित पंकज साहेबराव मराठे (सुर्यवंशी) (रा. हरिविठ्ठल नगर) याने पेट्रोल टाकून पेटवून दिली. ही घटना सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.