जालना: जालन्यात एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी गोर बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा...
Jalna, Jalna | May 7, 2026 जालन्यात एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी गोर बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी समाजाकडून मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही ही मागणी मान्य झालेली नाही. या मागणीसाठी राज्यभरात बंजारा समाजाने अनेक मोर्चे, आंदोलने आणि उपोषणे केली आहेत. तरीदेखील शासन या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप आंदोलकां