सेनगाव: हिवरखेडा येथे सततच्या पावसामुळे घर कोसळून संसारपयोगी साहित्याचे नुकसान,तात्काळ भरपाई देण्याची मागणी
सेनगांव तालुक्यातील हिवरखेडा परिसरामध्ये सततच्या पावसामुळे घर कोसळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. हिवरखेडा येथील साहेबराव कळणू जाधव यांचे राहते घर सततच्या पावसामुळे कोसळले असून यामध्ये मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे. तसेच या घटनेमध्ये घरातील सर्व संसारपयोगी साहित्य दाबून मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी जाधव कुटुंबीयांच्या वतीने आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आली आहे.