जालना: संपादक संतोष भुतेकर यांच्यावर हल्ला; गुन्हा दाखल न झाल्याने पत्रकारांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Jalna, Jalna | Jun 3, 2026 जालना जिल्ह्यातील मराठी वृत्तपत्राचे संपादक संतोष भुतेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना समोर आली असून, घटनेनंतर एक दिवस उलटूनही संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बुधवार, दि. 3 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास कडक उन्हात पत्रकारांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.