नागपूर ग्रामीण: अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या प्रस्तावित व्यापार करारावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय युवक काँग्रेसने या कराराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.