अकोला: मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित, गुन्हे तपासात होणार मदत; एस.पी. कार्यालय येथे एस.पी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी
Akola, Akola | Sep 15, 2025 पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते दिनांक १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन ला हिरवी झेंडी दाखवून कार्यान्वित करण्यात आली. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत सुरु झालेली ही व्हॅन घटनास्थळी त्वरित पोहचून पुरावे गोळा करण्यास, सीन-मॅपिंग, फोटोग्राफी तसेच प्राथमिक केमिकल व ट्रेस अनॅलिसिस करण्यास सक्षम आहे. यामुळे तपासाची गती आणि अचूकता वाढणार असून, पुरावे सुरक्षित पद्धतीने लॅबला पाठवता येतील. व्हॅनमध्ये फॉरेन्सिक तज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक, वाहन चालक व प