राजूरा: राजुरा येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ
नगर परिषद राजुरा च्या निवडणुकीसाठी अखेर काॅग्रेस व शेतकरी संघटना यांच्या युतीची रितसर घोषणा दि. ११ नोव्हेंबरला १ वाजता रोजी राजुरा येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे झालेल्या सभेत करण्यात आली. यामुळे या बहुप्रतीक्षित युतीला अखेर नेते व कार्यकर्त्यांनी मान्यता देत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ अधिक घट्ट बनली असून संपुर्ण निवडणूक एकदिलाने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले .