मुकुंदवाडीत गुन्हेगारी उफाळली, नशेखोरांनी चक्क पाच दुचाकी पेटवून दिल्या
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 7, 2025
आज दिनांक 7 डिसेंबर सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात गुन्हेगारी पुन्हा डोकंवर काढत आहे. लूटमार, खंडणी आणि प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांनी आधीच नागरिक त्रस्त असताना आता नशेखोरांनी थेट सर्वसामान्यांच्या वाहनांनाच लक्ष्य केले आहे. राजनगर परिसरात रात्री उशिरा नशेखोरांच्या टोळीने ज्वलनशील पदार्थ टाकून पाच दुचाकींना पेटवून दिले. काही सेकंदातच या गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. गेल्या दोन महिन्यांपासून गुन्हेगार आणि नशेखोरांची टोळी परिसरात दहशत माजवत असल्याची रहिवाशांची