भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज (दिनांक 16 डिसेंबर) लोकसभेत 'निरसन आणि सुधारणा विधेयक, २०२५' वर आपले विचार मांडताना जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान केलेल्या आपल्या दमदार भाषणात, डॉ. पडोळे यांनी प्रामुख्याने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भेल प्रकल्प, थर्मल प्लांट आणि वाढत्या शेतकरी व स्थानिक बेरोजगारांच्या गंभीर समस्या आक्रमकपणे मांडल्या, तसेच या प्रश्नांवर तात्काळ निरसन करण्याची मागणी करत विधेयकावरील चर्चेत