वाशिम: जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी वाशीम जिल्ह्यातील ५२ जि.प.गटासाठी नियोजन भवन येथे आरक्षण सोडत जाहीर
Washim, Washim | Oct 13, 2025 जि.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ एकुण ५२ जि.प.गटासाठी आरक्षण सोडत आज दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी जि.प.निवडणूक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.निवडणूक राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.