दिग्रस: बस स्थानकात अज्ञात चोरट्या महिलांकडून प्रवासी महिलेचे ७८ हजारांचे दागिने लंपास
दिग्रस बस स्थानकावर मंगरूळपीरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्या महिलांनी एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील अंदाजे ७८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. फिर्यादी प्रमिला महादेव तायडे (वय ५०, रा. शहापूर, ता. मंगरूळपीर) या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्या महिलांनी गळ्यातील दागिने लंपास केले. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली असून, फिर्यादी यांनी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.