जत: आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा 30 सप्टेंबर रोजी होणार
Jat, Sangli | Sep 27, 2025 जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक 30 सप्टेंबर रोजी आरेवाडीतील बिरोबा वन या ठिकाणी त्यांचा दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरी या दसरा मेळाव्यास सर्व मंडळींनी उपस्थित राहावे असे आव्हाने त्यांनी यावेळी केले.