धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे रस्त्याच्या बाजूला हो असे सांगितल्याच्या कारणावरून एकाने दारूच्या नशेत हातात कुऱ्हाड घेवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.