जालना: जालना येथील लाव्हा रसाचे रहस्य उलगडले; विद्युत तांत्रिक बिघाडामुळे ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्याचे उघड
Jalna, Jalna | Apr 6, 2026 जालना शहरातील सामानगाव रोड परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सोमवार दि. 6 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागील नेमके कारण आता स्पष्ट झाले असून, हा प्रकार कोणताही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे समोर आले आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.