जुन्नर: खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून लुटले दीड कोटी! ओतूरमधील ब्लॅकमेलर पती-पत्नीचा पर्दाफाश
Junnar, Pune | Nov 28, 2025 बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.खामुंडी (ता.जुन्नर) येथील मारुती मनोहर कदम (वय ६१) यांनी १५ मे २०२५ रोजी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.