पाथरी येथील रहिवासी अशोक शालीकराम भलावी (३८) या तरुणाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची अधिकृत माहिती भंडारा पोलीस स्टेशनकडून प्राप्त झाल्यानंतर गोबरवाही पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली होती. यासंदर्भात भंडारा पोलीस स्टेशनकडून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे, गोबरवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या आदेशान्वये १३ जानेवारी रोजी मर्ग नोंद करण्