अमरावती: सिद्धार्थ नगर सिविल लाईन येथील एका घरातून अंदाजे 30,000 रुपयांचा चायना मांजा जप्त, गाडगेनगर पोलिसांची कारवाई
दिनांक 15/10/2025 रोजी गाडगे नगर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,इसम रवींद्र लल्लुसिंग चव्हाण वय 52 वर्ष राहणार सिद्धार्थ नगर सिविल लाईन अमरावती हा त्याचे राहते घरामधून एका खाकी बॉक्स मधून प्रतिबंधित चायना मांजा विक्री करीत आहे. त्यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यामधून *30 नग मोनोफिल गोल्ड कंपनीचे प्रतिबंधित चायना मांजा किंमत अंदाजे 30,000 रुपये* असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.