फलटण: बिरदेवनगर फलटण येथून २५ वर्षीय विवाहिता झाली बेपत्ता
Phaltan, Satara | Sep 15, 2024 बिरदेवनगर फलटण येथून २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण शहर पोलीसांनी रविवारी सांगितले की बिरदेवनगर फलटण येथून रविवार दि. १५ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता सौ. शर्मिला गणेश नामदास (वय २५) ही विवाहिता कोठे तरी निघून गेली. नातेवाईकांनी विवाहितेचा परिसरात शोध घेतला मात्र विवाहिता मिळून आली नाही. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी खबर दिली. याबाबत फलटण शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.