कळमनूरी: ॲमेझॉन ऑनलाईन कडून कळमनुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाची फसवणूक,मागवली फ्रिज, निघाला लाकडी तुकडे,घाण कचरा
कळमनुरी शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना थंड गरम पाणी पिण्यासाठी व्होल्टास कंपनीचे वॉटर डिस्पेसन मशीन फ्रिज ॲमेझॉन ऑनलाइन कडून मागवले होते .आज दि.16 ऑक्टोबर रोजी सदर पार्सल कार्यालयात दाखल झाली असता एका वोल्टास कंपनीच्या बॉक्समध्ये घाण कचरा, लाकडाचे तुकडे, प्लायवूड, फुटलेले स्पीकर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.