महाड: कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत महाडच्या रस्त्यांवर शिवसेनेची भव्य प्रचार रॅली
Mahad, Raigad | Dec 1, 2025 आगामी महाड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आज सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत महाडच्या रस्त्यांवर शिवसेनेची भव्य प्रचार रॅली उत्साहात पार पडली. हजारो शिवसैनिक, निस्सीम समर्थन करणारे महाडकर अगदी कुटुंबासारखे एकत्र जेव्हा रस्त्यावर उतरतात, तेव्हा महाडच्या मातीचा अभिमान जागृत होतो. आजच्या अंतिम प्रचारदिनी, महाडच्या कानाकोपर्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा जनतेशी दिलखुलास संवाद साधला. उद्या मतदानाचा दिवस. आता फक्त एकच आवाहन, महाडच्या प्रत्येक मतदारांनी 'धनुष्यबाण' चिन्हाची निवड करून महाडच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र यावे. असे देखील मंत्री गोगावले म्हणाले.