दिग्रस: डायल ११२ वर खोटी माहिती दिल्याने कारवाई, दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथील घटना
दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथे पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी सुनील राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आरोपी रामेश्वर तुळशीराम राठोड रा. वरंदळी याने डायल 112 वर कॉल करून “माझ्या कुत्र्याला गावातील लोक मारत आहेत, मला मदत हवी आहे” अशी तक्रार केली. तक्रारीवर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तेथे कोणतीही घटना घडलेली आढळून आली नाही. यानंतर पोलिसांनी परत कॉल करून विचारणा केली असता आरोपीने पोलिसांशी वाद केल.