कोंढा येथे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एका दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून अनोळखी तीन चोरट्यांनी दुकानातून ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपक लक्ष्मीनारायण गांधी (वय ५३) रा. कोंढा यांचे कोंढा येथे दुकान आहे. ११ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास दीपक गांधी हे दुकानात असताना, तोंडाला कपड्याने झाकलेल्या ३ अनोळखी इसमांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला.