रामटेक: कांद्री माईन रेल्वे क्रॉसिंग जवळील अपघातात मनसर येथील 22 वर्षीय युवक ठार
Ramtek, Nagpur | Mar 31, 2026 नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कांद्री माईन्स रेल्वे क्रॉसिंग शिवारात सोमवार दिनांक 30 मार्चला रात्री आठ वाजताच्या दरम्यान मागून भरता येणाऱ्या एका अज्ञात वाहनाचा कट लागल्याने दुचाकी चालक युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी असून तो मेओ हॉस्पिटल नागपूर येथे आयसीयू मध्ये भरती असल्याचे रामटेक पोलिसांनी सांगितले. मृतकाचे नाव नादील खान वय 22 वर्षे राहणार मनसर असे आहे.