बार्शीटाकळी: बार्शीटाकळी शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये विविध समस्या नागरिकांचे नगरपरिषद प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
बार्शीटाकळी शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये नगरपरिषद प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात यासाठी नागरिकांकडून नगरपरिषद बार्शीटाकळी येथे निवेदन देऊनही कुठली कारवाई न झाल्याने अखेर आंदोलन करण्यात येणार असा इशाराही परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.