जत: उमदी-विजयपूर रस्त्यावर उमदीजवळील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या मैदानाजवळ अपघातात एक ठार
Jat, Sangli | Aug 24, 2025 नगर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी-विजयपूर रस्त्यावर उमदीजवळील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या मैदानाजवळ मोटारसायकल व मालवाहू ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील भाऊसाहेब भीमा लोखंडे (वय ४०, रा. निंबाळ) ठार झाला. महामार्गावर उमदीकडून जाणारी युनिकॉर्न तर, समोरून येणारी मालवाहू या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. यात युनिकॉर्न कंपनीच्या मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे.