जालना: नियम धाब्यावर बसवून घाणेवाडी तलावातील गाळ उपसा जोरात ?
शेतकऱ्यांना मोफत गाळाऐवजी ट्रॅक्टरमागे हजारोंची वसुली; वीटभट्ट्या
Jalna, Jalna | May 17, 2026 जालना : जालना तालुक्यातील घाणेवाडी तलावातील गाळ उपसा काम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून, महानगरपालिकेने घालून दिलेल्या नियम व अटी-शर्तींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप मनसे जिल्हा सचिव आर आर पाटोळे यांनी केला आहे. तलावातील गाळ उपसा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून, प्रशासनाचे नियम केवळ कागदोपत्रीच राहिले असल्याची टीका त्यांनी केली आहे. घाणेवाडी तलावातील गाळ उपसा काम ताटेवाडी येथील शेतकरी अंबादास कोलते यांना देण्यात आले आहे. हे काम मंजूर करताना जालना महा