औंढा नागनाथ: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळा बाजार येथे अतिवृष्टी मदती बाबत शेतकऱ्यांशी साधला संवाद,मदत मिळालीच नाही शेतकरी
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली का या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारची मदतच मिळाली नसल्याने व्यथा मांडल्या यादरम्यान जवळा बाजार परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते