30 डिसेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार बेसा पिंपळा रोडवर हातात शस्त्र घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव प्रशांत लांडे असे सांगण्यात आले असून आरोपीकडून दोनशे रुपये किमतीचा एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.