भोकरदन: दानापूर परिसरात व शेत शिवारात तुरळक बरसला अवकाळी पाऊस
आज दिनांक 4 एप्रिल 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक अवकाळी पाऊस झाला आहे, या अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने शेत शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे व मुख्य रोड वर रहदारी करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती ,तसेच मुखर रोडवर या पावसाने व शेत शिवारात पाणी साचल्याचे सुद्धा चित्र दानापूर परिसरात आज पाहायला मिळाले.