भंडारा जिल्ह्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे आज २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान त्यागमूर्ती माता रमाई यांचे बंधू शंकर यांची कन्या (भाची) शुभांगी ताई धोत्रे यांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले, त्यानंतर विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व तथागतांची प्रतिमा देऊन शुभांगीताईंचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रबोधनकार...