भंडारा: अतिवृष्टीने जिल्ह्याला मोठा फटका! चार दिवसांत 1692.20 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, 292 गावे बाधित; 4367 शेतकरी संकटात
मागील 4 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने भंडारा जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाच्या अंदाजे आकडेवारीनुसार 292 गावांमधील 4367 शेतकरी प्रभावित झाले आहेत. अंदाजे 1692.20 हेक्टर शेतजमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी प्राथमिक असल्याने अंतिम सर्वेक्षणानंतर हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत सर्वच तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीला आले.