अकोला शहरातील 18 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केली.अकोट फाईल पोलीस ठाणे हद्दीत 18 वर्षीय शेख दानिश शेख अनीस या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फरीदनगर, नायगाव परिसरात घडली. अल्पवयातच दानिशने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणताही ठोस कारण समोर आलेले नाही. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून कोणता ताण, दबाव किंवा कौटुंबिक वाद तर कारणीभूत नाही ना, याचा शोध घेत आहेत. मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टम पाठवला