नायगाव पंचायत समिती येथील घरकुल प्रकरण ताजे असताना आता लोहा तालुक्यातील लाभार्थी पैशाच्या मागणीपायी त्रस्त झाले असून आज दि. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 4 :30 च्या दरम्यान लोहा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समिती येथील घरकुल विभागात चांगलाच गोंधळ घालत आमचे हक्काचे बिल तथा पैसे कधी टाकणार? असे म्हणत ठिय्या मांडला होता, हा ठिय्या मांडलेला व्हीडिओ संध्याकाळी 7 च्या सुमारास प्रसार माध्यमावर व्हायरल होत आहे.