मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर गावठी दारू व कच्चे रसायन आढळून आले. कारवाईदरम्यान अंदाजे २ हजार लिटर कच्चे रसायन, तयार दारू तसेच ५ ते ६ हातभट्टी यंत्रे जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली.