नागपूर शहर: व्यक्तीचा शिवनगर येथे घराच्या बाथरूम मध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह,आईसह संपूर्ण परिवारा विरोधात खुनाचा गुन्हा
पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत राहणारे सुधीर खंडारे वय 40 वर्ष यांचा दिनांक 2 सप्टेंबरला मध्ये रात्री एक ते सकाळी सात वाजताच्या दोन दरम्यान त्यांच्या घरातील बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. दरम्यान ते बाथरूम मध्ये पाय घसरून पडले आणि त्यांना नळ लागल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या परिवारातर्फे देण्यात आली होती या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासा अंती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.