पाटोदा: मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याला सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली
Patoda, Beed | Oct 2, 2025 सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. राज्यातील नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडत असून सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध भागातून आलेले अनुयायी गडावर दाखल झाले. पारंपरिक वेशभूषा, भगवे झेंडे आणि जयघोषांनी संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गडावर गर्दी केली.