महाड शहरात भटकी कुत्री व कबुतर यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांच्यामुळे सामन्य नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. महाड मधील दशानेमा गुजराती समाजाच्या वतीने महाडचे नगराध्यक्ष सुनिल कविस्कर यांना दिलेल्या निवेदनातून भटकी कुत्री व कबुतर यांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधून त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.