भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकात किराणा दुकानात 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
आज दिनांक 8 मे 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी 3:45 वाजेच्या सुमारास आदण्यात दोन चोरट्यांनी विजय किराणा दुकान फोडून दुकानात असलेली रोख रक्कम व मौल्यवान साहित्य चोरून नेले असल्याची घटना घडली आहे, यावेळी हे दोन्हीही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी किराणा दुकान मालक पिसे पाटील यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे.