चांदूर बाजार: प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात चांदूरबाजार तहसील कार्यालयावर, शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
सततच्या पावसाने झालेल्या पिकाच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी घेऊन, आज दिनांक 22 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता चे दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढून चांदूरबाजार तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी सोयाबीन संत्रा केळी तहसीलदाराच्या दालनात फेकून सरकारचा निषेध केला. मागण्या मान्य न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला