अंजनगाव सुर्जी: कृउबा समिती येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे बेहाल;घडाला फक्त २ ते ३ रुपये भाव;व्यापाऱ्याचा शेतकऱ्यांनी केला सत्कार
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बहुतांश शेतकरी केळी,संत्रा,पान पिंपरी,कांदा अशा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात.परंतु अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल स्थितीत आहेत.त्या पार्श्वभूमीवर केळी बाजारातील घसरणीने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढविली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीत आपली केळी विक्रीस आणली असता व्यापाऱ्यांनी प्रतिघड केवळ २ ते ३ रुपये असा अत्यंत तुटपुंजा भाव दिला.