पनवेल: वाशी येथे स्लॅब कोसल्ल्याप्रकरणी ठेकेदार व घरमालकावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 8, 2024 वाशी येथील सुदामा इमारतीमध्ये शुक्रवारी ही दुर्घटना घडली होती. दुसऱ्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. फ्लोअरिंगवर जुन्या टाइल्स काढून नव्या टाइल्स बसवल्या जात होत्या.अगोदरच कमकुवत असलेल्या बांधकामावर हातोड्याचे ठोके बसल्याने हादरून दुसऱ्या मजल्याचे फ्लोअरिंग पहिल्या मजल्यावरील घरात कोसळले. त्याठिकाणी राहणारे नितीन गायकवाड यांचे कुटुंबीय घराबाहेर असल्याने दुखापत झाली नाही. मात्र, घरातील वस्तूंचे मात्र नुकसान झाले आहे.घरमालक व ठेकदारावर वाशी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.