तिरोडा: लेदडा येथे मराठी नाटक "वादळ उठलय संसारात" चे आयोजन; रजनीताई कुंभरे, तुमेश्वरीताई बघेले, तेजरामजी चव्हाण यांची उपस्थिती
Tirora, Gondia | Nov 6, 2025 तिरोडा तालुक्यातील ग्राम लेदडा येथे मराठी तीन अंकी संगीत नाटक "वादळ उठलय संसारात" या नाटकाचे उद्घाटन दिनांक सहा नोव्हेंबरला रात्री दहा वाजता दरम्यान पंचायत समिती तिरोड्याचे सभापती श्री तेजरामजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभरे, जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरीताई बघेले, पंचायत समिती सदस्य प्रमिलाताई भलावी यांच्या हस्ते रंगमंचाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.