पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला असून धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण ऐशी टक्क्याहून अधिक भरले आहे तर कवडास धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून धामणी आणि कावळा या दोन्ही धरणातून सूर्या नदी चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सूर्य नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.