चंद्रपूर: नूतनीकरणासाठी पं. नेहरू प्राथमिक शाळा स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा न व्हावयास मनपाचे प्रयत्न
चंद्रपूर महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे नवीन शाळा इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू असून नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून ही शाळा तात्पुरती किरायाने घेतलेल्या इमारतीत सुरू करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी अध्यापनात अडथळा निर्माण झाल्याने शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.