नागपूर ग्रामीण: बेलतरोडी परिसरातून तरुणी बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन
मनीष नगर, बेलतरोडी परिसरात राहणारी वैभवी अनिल अलोने ही २१ वर्षीय तरुणी दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री १० वाजेपासून घरातून बेपत्ता झाली आहे. ती शांती सोसायटी, कुसुम नानकर यांच्या घरी राहत होती. ही मुलगी कोठेही आढळून आल्यास किंवा तिच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.