आमगाव: शिशुविहार शाळेतील भार्गवीला कांस्यपदक, चंद्रपूर येथे झाली स्पर्धा
Amgaon, Gondia | Oct 18, 2024 आमगाव तालुक्याच्या ग्राम किडंगीपार येथील शिशुविहार शाळेतील विद्यार्थिनी भार्गवी ब्राह्मणकर उंचउडी स्पर्धेत विभागीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त केले,ही स्पर्धा 17 ऑक्टोबरला 12 वाजता चंद्रपूर येथे पार पडली. 18 ऑक्टोबर रोजी 10 वाजता शाळेत आल्यानंतर विद्यार्थिनीचा क्रीडाशिक्षक विनोद गायधने व मुख्याध्यापिका संगीता डोये व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे.