सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे त्या आजाराचा संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण करणे शक्य आहे सिकलसेल रुग्णांना नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे. तज्ञांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणी आवश्यकता आहे. फॉलिक ऍसिडच्या गोळ्या नियमित घेणे. भरपूर पाणी पिणे. गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे. सिकलसेल आजारावर पूर्ण उपचार नसला तरी योग्य औषधोपचार नियमित तपासणी समतोल आहार व काळजी घेतल्यास आजार नियंत्रणात ठेवता येतो.